गड आला पण सिंह गेला ...............!

2 comments:

गड आला पण सिंह गेला ...............!


हे वाक्य सर्व महाराष्ट्रियानी एकदा तरी ऐकलेच  असेल… (नसेल ऐकले तर  पुढे वाचू  नका ............. :) )

सिंहगड वाचावताना  तानाजी मालुसरेंचा मृत्यु  झाला  हे ऐकल्यावर शिवाजी महाराजांच्या तोंडी आलेले हे वाक्य ..

सुट्टीच्या  लोह्गड  चा बेत फसल्यावर सिंहगड ला जायचे ठरले .  बाहेर छान पाउस  पडत होताच ..
सिंहगड ला जाणे  सर्वात सोपे असावे  , बस  , जीप , इत्यादी बरेच मार्ग आहेत .

चढायच असल्यास मार्ग दूसरा आहे ..साधारण ४५ मिनट मधे आपण हा गड  चढू शकतो शकतो (सरासरी)

 गडावर अजुन पाय ठेवतोच तोवर घरून फ़ोन .. वर्तमान पत्रा  मधे बातमी आली आहे ..एक मुलगी फोटो काढ़ायसाठी  पोज  देताना धुक्याचा अंदाज न आल्यामुळे खोल दरीत पडली ...शोध पथक  शोध घेत आहेत .. नागरिकाना  जपून  फिरण्याचे  आवाहन .

आम्हाला समजुन चुकले की घरी जाईपर्यन्त सिंहगड आणि आजकालच्या पीढ़ी चे  ऐकून न घेण्याची तयारी  यावर चर्चासत्र(?) चालू राहणार :) :)

असो ..............

सिंहगड म्हणजेच आपला कोंढ़ाणा ..

पूर्वी अदीलशाही मधे असलेला हा किल्ला सुभेदार म्हणून असलेल्या दादाजी कोंड देवांच्या  ताब्यात होता ..त्यांच्या  मृत्यु नंतर किल्ल्याच्या किल्लेदार सिद्धि  अम्बर याला लाच देऊन शिवाजी महाराजानी स्वराज्यात आणला  व  आपले लश्करी केंद्र बनवले ..

पण इ स  १६४९  मधे शहाजी राजांच्या सुटकेसाठी  त्याना तो परत अदीलशहा ला द्यावा लागला ..

सिंहगड प्रसिद्ध अहे तो मुख्यत्वे तानाजी मालुसरेंच्या बलिदाना साठी ..महाराज जेव्हा  आग्र्या वरून परत आले  तेव्हा त्यानी सर्व किल्ले परत ताब्यात घेण्यास सुरुवात केली  तेव्हा तानाजी ने त्याना कोंढाणा मिल्वुन द्यायचे कबुल केले.

कबुल केल्याप्रमाणे त्यानी गड़ मिळवून  दिला पण त्यांचा मृत्यु झाला ....

हा   झाला पुर्वीचा सिंहगड .... सध्याच्या सिन्ह्गडा कड़े कोणी ऐतिहासिक स्थळ  म्हणून पाहत नाही .. full commercial ......anyways...

ही झाली ऐतिहासिक बाजु ..

सध्याचा सिंहगड : - १ ५  ऑगस्त २००८    पासून  आसपास टोल  घ्यायला सरकार ने सुरुवात केली . २०१० पर्यन्त तरी गडावर कहिहि  सुधारणा दिसली नाही  ,..( जमा रक्कम : ६५  लक्ष )
पावसाळ्या  मधे सिंहगड म्हणजे एक refreshment.,.....................must go once in an year during mansoon /heavy rain :)
गडाला   २ दरवाजे आहेत .. एक आहे कल्याण दरवाजा  आणि एक पुणे दरवाजा ..




 

  

   गडावरील पाहण्याची ठिकाणे :
 
  दारूचे कोठार :- दरवाज्यातून आतमधे  प्रवेश केल्यावर उजव्या बाजूची दगडी ईमारत म्हणजेच दारूचे                               कोठार .
  देव  टाक्या : तानाजी स्मारकाच्या मागे डाव्या एक छोटा तलाव आहे ..त्याच्या डाव्या बाजूला गेल्यास          देव टाक्या दिसतील  
   कोंढाणे श्वर मंदिर :  शंकराचे प्राचीन मंदिर।
 
 अमृतेश्वर भैरव मंदिर : भैरव व भैरवी च्या मुर्त्या आहेत ..

खालील फोटो २ वेगळ्या ट्रेक मधे घेतलेले आहेत :)


दुरचित्र वाणी चा प्रसिद्ध खाम्ब



 
 
 






दरवाजा ...........






सिंहगड मान्सून  मधे ......



 



वरील  फोटोची उन्हाळी आवृत्ती  :) :)







राज सिनेमा मधील दृश्य वाटत आहे :)






तानाजी  मालुसरे स्मारक 


 





खाण्याची व्यवस्था :  या बाबतीत सिन्ह्गडाचा  हात कुठलाच गड धरु शकणार नाही ...
गरम गरम पिठले भाकरी , कांदा भजी अणि मडक्यातले दही ...........बरेच लोक केवळ  हे खाण्यासाठी सुद्धा सिन्हगडाला  आवर्जुन भेट देतात .....






 त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात  एकदा तरी सिंहगडाला  नक्की भेट द्यावी :) :) :)



हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - कोंकण कडा

1 comment:
समुद्रसपाटीपासून तब्बल 3२०० फूट उंचावर. जवळपास १ किमी खोलीची नाळ पार करून आम्ही खिंडीत पोहोचलो होतो. बेलपाडा गावातुन निघाल्यापासून वारं काय हे विसरलो होतो. दोन्ही बाजूंनी उंचच उंच कडे असल्यामुळे वाऱ्याचा पत्ताच नव्हता. पाय पुरते थकलेले. तहान-भूक सपाटून लागलेली. पण चालणे भाग होते. नळीची वाट संपली होती. आता एका छोट्याश्या घाटवाटेतून वर चढायचे होते.७००-८ ०० फुटाची चढाई अजुन बाकी होती.थोडा वेळ थांबुन चढायला सुरुवात केली. दाट झाडीतुन वाट काढत एका मोठ्या आणि अखंड खडकाजवळ पोहोचलो. तो खडक सहज पार करून वर चढलो तर कलाडगडाचे आणि प्रचंड नाफ्त्याचे सुंदर व विहंगम दृश्य आमची वाट पाहत होते. नाफ्त्याच्या नेढयाने लक्ष वेधून घेतले. ऊन वाढत चालले होते.उन्हाचे चटके अंगावर घेण्यापेक्षा आम्ही लगेच झाडीत शिरलो. येथुन जवळपास अर्धा तास लागणार होता कोंकण कड्या पर्यंत पोहोचायला.

घाटातला शेवटचा रॉक प्याच चढून आम्ही हरिशचंद्र गडाच्या पठारावर पोहोचलो आणि निसर्गानी आमची घनचक्कर,कात्राबाई ,आजोबा गड,कलाडगड,इत्यादी दुर्ग सख्यांची भेट घालवून दिली. भर उन्हात चालताना या दुर्गा रत्नांची भेट म्हणजे नळीच्या वाटेने आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. भुकेमुळे पोटात कावळे जरी ओरडत असले तरी तेथून पाय काढावासा वाटत नव्हता. पण कोंकण कड्याच्या भेटीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. चालायला लागलो कोंकण कड्याकडे.


कोंकण कडा .निसर्गाची एक अफलातून किमया. लहान-थोरांचे, प्रत्येकाचे म्हणजे ज्यांना कमीत कमी माहिती आहे अशांना एक जबरदस्त आकर्षण असलेला सह्यपर्वतामधला भव्यदिव्य कातळकडा.इथे येणाऱ्या प्रत्येकाला "निसर्ग आपल्याशी बोलतो" असा अनुभव देणारा.जवळपास अर्धा किमी परिघाचा अंतर्वक्र कडा.नळीच्या वाटेतुन आल्यामुळे त्याचे हे वेगळेच भन्नाट रूप आम्ही अनुभवत होतो. इंद्रानी तर पुढे  कड्यासमोर जाऊन बैठकच मांडली. अक्षरशः तहान-भुक विसरून आम्ही कड्याचे हे अजब रूप न्याहाळत बसलो होतो.दक्षिणेकडे भैरव गडाची कातळ भिंत महाकाय कोंकण कड्याच्या समोर केवढी छोटी भासत होती. सिंडोळा किल्ला,नानाचा अंगठा लक्ष वेधुन घेत होते. नळीच्या वाटेतून उंचच उंच दिसणारे रोहीदासाचे शिखर आता आमच्या बरोबरीचे वाटत होते.  उठावसं वाटत नव्हतं. पण पोटात कावळ्यांनी आता  ओरडण्याबरोबर थैमान घालायला  सुरवात केली होती. भास्करला जेवणाचं आधीच सांगितलं असल्यामुळे निश्चिंत होतो.

कोंकण कड्यावर पोहोचलो. शरीर चांगलंच थकलं होतं. पण कड्यावरच्या गार वारयानी थकवा थोडासा दूर झाला होता. सर्वात आधी पाण्याची तहान भागवली आणि लिंबू सरबताचे दोन-तीन ग्लास रिचवून हुशार झालो.तंबू ठोकायला सुरवात केली.आमचा छोटासा आशियाना सज्ज झाला आणि जेवण पण तयार होते. पिठलं-भाकरी वर यथेच्छ ताव मारून पोटभर जेवण उरकलं. वामकुक्षी म्हणून दिली ताणुन. इंद्रा आणि निखिल तर मेल्यासारखे झोपले होते. तिकडीच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा स्पष्ट दिसत होत्या. माझा तर मागच्या दोन वर्षापासुनचा स्वप्नवत ट्रेक पूर्ण झाला होता. 





एकदम सुर्यास्तालाच जाग आली. कोंकण कड्यावर आता नेहमीप्रमाणे सुर्यास्ताचा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती.आलेले सहलीकर आपापल्या परीने चित्रविचित्र पोज देऊन फोटो काढण्यात दंग होते. पण आम्हाला यात काहीच इंटरेस्ट नसल्यामुळे एका जागी जाऊन बसलो.निसर्गाचा विलक्षण सोहळा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. खूप दिवसांनी कोंकण कड्याशी आम्हा भटक्यांच्या निवांत गप्पा रंगल्या होत्या.खरच आम्ही आज भारावलो होतो.शेवटी सुर्यनारायणानी निरोप घेतला आणि आम्ही आमच्या तंबुत परतलो. 


Maggie !!!! रात्रीच्या जेवणाचा बेत. सरपण गोळा झाले. थोड्याच वेळात गरमागरम maggie तयार झाली. पोटभर हादडली. गप्पा मारता मारता कधी झोपेच्या अधीन झालो कळालेच नाही. 



सकाळी जाग आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. बापरे केवढी ती झोप. म्हणजे ट्रेकला एवढं निवांत आम्ही कधीच नव्हतो. सकाळची आन्हिक उरकताना इंद्राच्या दातघासनीच अजब कौतिक,"म्हणे मी घाबरलो नळीच्या वाटेला!" :) पटापट आवरलं. कोंकण कड्याचा निरोप घेतला. परत भेटण्याचे वचन देऊन खिरेश्वर मार्गे परतीचा प्रवास सुरु झाला.   

 
ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. 
संदिप

कोलाबा(कुलाबा) अलिबाग …

2 comments:
समुद्रामधल्या गडांचे कुतूहल नेहमीच आपल्याला असते . असाच एक समुद्रातला गड म्हणजे कोलाबा(कुलाबा).
अलिबाग च्या समुद्र किनाऱ्या वरून दृष्टीस पडणारा किल्ला. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण  १ - २ किमी अंतरावर समुद्रात आहे.
सकाळी भरती च्या वेळी किल्ल्यावर जायचं असल्यास बोट शिवाय पर्याय नाही .





किल्ला :-


किल्ल्यावर जाण्याआधी आम्ही समुद्राचा आनंद लुटण्याचे ठरवले :)






 समुद्रात मनसोक्त डुंबून झाल्यावर ओहोटी च्या वेळी आम्ही किल्ल्यावर जायचे ठरवले … तेव्हा ओहोटी मुळे
चालत जाणे  शक्य होते . 




इसवी सन १६८०  मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधल्याचे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या बोटींवर हल्ला करण्यासाठी या किल्ल्याच्या मुख्यत्वे उपयोग होत असे.  


कालांतराने हा किल्ला कान्होजी आन्ग्रेंच्या ताब्यात आला. काही काळ त्यांच्या परिवाराच्या ताब्यात राहिल्यानंतर किल्ल्यावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. 

ताज्या पाण्याची विहीर या किल्ल्यामध्ये अजून आहे . काही स्थानिक लोकांनी तिथे लोकांना जेवण उपलब्ध व्हावे म्हणून स्वयंपाका ची व्यवस्था केली आहे . त्यासाठी सुद्धा हे लोक विहिरीचे पाणी वापरतात. 

  

किल्ल्यावर बरीच मंदिरे आहेत ,भवानी आई मंदिर, पद्मावती मंदिर , महादेव मंदिर, गुलाबी मंदिर , बोपदेव मंदिर ,  त्यातील मुख्यत्वे सिद्धीविनायकचे मंदिर सुंदर आहे . 





अप्सरा तलाव ----


    अजून अनेक monuments या किल्ल्यावर आहेत , आंग्रे वाडा , नानीबाई आंग्रे चा वाडा (कान्होजी आंग्रेंच्या विधवा), तळघर , मुख्य कार्यालये , इत्यादी । 
 
किल्ल्ल्यावरून दिसणारे  दृश्य :
 

 
 

 सध्या किल्ल्याच्या डागडुजी ची जबाबदारी Archaelogical Survey of India (ASI) घेत आहेत त्यामुळे प्रवेश फी भरावी लागते :) त्यातल्या त्यात भारतीयांसाठी कमी आहे (५ रु) …परकीय नागरिकांसाठी फी (१००  रु) 
पण हे मानावे लागेल कि किल्ला बर्यापिकी सुस्थितीत आहे … 

 परत येताना घोडागाडी करायचे ठरवले …. परत किनार्यावर येउन बसलो तेव्हा सूर्यास्त होत होता … वाह काय सुंदर दिसत होते दृश्य